व्याज व दंड या साठीची जीएसटी अभय योजना- पैसे भरण्याची मुदत ३१ मार्च तर अर्ज करण्याची तारीख ३० जून- शासनाकडून खुलासा

GST 4 YOU

कर दात्यांमध्ये असा गैरसमज झाला आहे की जीएसटी व्याज व दंड माफी अभय योजने खाली अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१.०३. २०२५ आहे. या संदर्भात, हे लक्षात घेतले पाहिजे की सदर योजने खाली अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१.०३.२०२५ नसून जीएसटी नियम, २०१७ च्या नियम १६४ (६) नुसार, करदात्यांना अधिसूचित तारखेपासून तीन महिन्यांच्या आत अर्ज दाखल करावे लागतील. म्हणून, करदाते ३०.०६. २०२५ पर्यंत व्याज व दंड माफी अर्ज दाखल करू शकतात.
    तथापि, ८.१०.२०२४ च्या अधिसूचना २१/ २०२४- (केंद्रीय कर) नुसार, कर माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी देय कर भरण्याची अंतिम तारीख ३१.०३.२०२५ आहे. म्हणून, करदात्यांना GST पोर्टलमधील "पेमेंट टूवर्ड्स डिमांड" फंक्शनॅलिटी वापरून अंतिम तारखेच्या आत आवश्यक ती कर रक्कम भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे.