फलटण नंतर आता इंदापूर मध्ये ही प्राप्तीकराचे छापे- आणखी एका दुग्ध प्रक्रिया व्यावसायिकाकडे चौकशी

GST 4 YOU


सातारा जिल्ह्यातील फलटण नंतर आता पुणे जिल्ह्यातील इंदापूर  मध्ये ही प्राप्तीकर विभागकडून छापे टाकण्यात आले असून या भागातील  बडे  उद्योजक , बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या या उद्योगसमूहाचे दुग्ध प्रकल्प, पशुखाद्य उत्पादन, पाणी प्रकल्प या ठिकाणी कार्यरत आहे. सुमारे २० लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प या ठिकाणी गेली आठ वर्षे कार्यरत आहे. राज्याच्या विविध भागांतून या ठिकाणी दूध आणले जाते. या माध्यमातून दूध पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. तसेच, बटर, लोणी, दूध पावडर, तूप यांचे उत्पादन घेऊन वितरण केले जाते. तसेच, पाणी प्रकल्प व पशुखाद्य उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे.                             परवा बुधवारी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे २५ अधिकारी आठ वाहनांच्या ताफ्यासह इंदापुर येथील उद्योगसमूहात दाखल झाले होते. त्यानंतर त्यातील एका पथकाने सदर उद्योजकाच्या  घरातही तळ ठोकुन झडती घेतली. मात्र अधिकृत रीत्या काही माहिती  मिळू शकली नाही.