साताऱ्यातील फलटण मध्ये बड्या राजकीय नेत्याच्या बंगल्यांवर 'प्राप्तिकर'चे छापे

GST 4 YOU
 
 
सातारा जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याच्या फलटण येथील बंगल्यांवर  व त्यांच्याशी संबंधित  डेअरीच्या पुणे व फलटण कार्यालयांवर काल सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापे टाकले.
      सकाळी सहापासून सुरू झालेले हे छापासत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती प्राप्तिकर विभागाकडून अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु कारवाईची माहिती मिळाल्यानंतर समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळपासून त्यांच्या  निवासस्थानाबाहेर ठाण मांडले होते.  फलटण येथील लक्ष्मीनगर परिसरात काल सकाळी सहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या परिसरात दाखल झाले. त्याचवेळी अधिकारी त्यांच्याशी संबंधित डेअरीच्या फलटण व पुणे कार्यालयांतही पोचले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. 
   माञ कारवाई मागील कारण अजून स्पष्ट झाले नाही.