राज्य वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाच्या अन्वेषण विभागाने कोची येथील कलूर येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील सामूहिक नृत्य कार्यक्रमाच्या आयोजकांच्या कार्यालये आणि निवासस्थानांवर एकाच वेळी टाकलेल्या आणि नऊ तासांहून अधिक काळ चाललेल्या छाप्यांमध्ये महत्वाची कागद्प्ते जप्त करण्यात आली असून छाप्यांमध्ये झालेल्या वसुलीच्या आधारे करचुकवेगिरीची संपूर्ण व्याप्ती निश्चित केली जाईल. येत्या काही दिवसांत विभाग कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आणि संबंधितांची चौकशी करण्यासाठी इतर एजन्सींशी समन्वय साधेल. तसेच सदर कंपन्यांच्या मागील व्यावसायिक क्रियाकलापांची देखील चौकशी करेल असे सूत्रांकडून समजले
पलारीवट्टोम पोलिसांनी मृदंगा व्हिजनचे मालक निगोशकुमार आणि मृदंगा व्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शमीर अब्दुल रहीम आणि ऑस्कर इव्हेंट मॅनेजमेंटचे पीएस जानिश यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.नोंदणी आणि इतर खर्चासाठी शुल्क वसूल केल्यानंतर आयोजकांनी सहभागींना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही अशा तक्रारीनंतर प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यात आला. कार्यक्रमातील एका सहभागीच्या आईने ही तक्रार दाखल केली होती.