बनावट आयकर अधिकारी निघाला खरा जीएसटी अधिकारी- जीएसटी अधिकाऱ्यास बनावट आयकर छापा प्रकरणी अटक

GST 4 YOU

स्पेशल 26 सारख्या घटना थांबण्याचे दिसत नसून गुजरातमध्ये बनावट अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्याचे प्रकार  सुरूच आहेत. दाहोद जिल्ह्यातील सुखसर गावात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. येथे सहा बनावट आयकर अधिकाऱ्यांनी परवानाधारक सावकाराच्या दुकानावर छापा टाकून 25 लाखांची मागणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या छाप्यात एका खऱ्या जीएसटी अधिकाऱ्याचाही सहभाग होता.गुजरातमध्ये गेल्या दीड वर्षात बनावट अधिकाऱ्यांनी छापे टाकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कच्छनंतर आता दाहोदमधून बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकल्याची घटना समोर आली आहे. बनावट आयकर अधिकाऱ्यांनी दाहोद जिल्ह्यातील सुखसार गावात छापा टाकून २५ लाखांची मागणी केली, त्यानंतर दुकान मालकाला संशय आला.   कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या दाहोद येथील अल्पेश प्रजापतीच्या दुकानावर सहा बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्याच्या दुकानात सापडलेल्या दागिन्यांची कागदपत्रे मागितली, ती उपलब्ध नव्हती, त्यामुळे गुन्हा नोंद न करण्याच्या बदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केली.दाहोद              पोलिस सूत्रानी सांगितले की  एकूण 5 आरोपींना अटक केली आहे, ज्यात एक खरा जीएसटी अधिकारी देखील आहे. विपुल काछिया हा जीएसटी अधिकारी असून त्याने इतरांच्या मदतीने बनावट आयटी छापे टाकले होते. अटक आरोपींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. तसेच, यापूर्वीही त्यांनी असे छापे टाकले आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.