विश्वासाचा गैरफायदा घेत, एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी वीरेंद्रकुमार कृष्णा पाटील आणि त्यांची पत्नी प्रियांका पाटील यांच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी वीरेंद्रकुमार पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी संदीप मारुती कोथळे (रा. कणेरीवाडी, ता. करवीर) यांचे एस. के. ट्रान्सपोर्ट अँड फर्निचर या नावाने व्यवसाय असून, आरोपी वीरेंद्रकुमार हा मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील असून कोथळे यांचा जीएसटी कर सल्लागार म्हणून काम करत होता. मे २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत, आरोपींनी फिर्यादींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, त्यांच्या जीएसटी क्रमांकाचा गैरवापर केला. या काळात फिर्यादींच्या व्यवसायाला सिमेंट विक्रीशी काहीही संबंध नसताना,आरोपींनी त्यांच्या फर्मच्या नावे बनावट खरेदी-विक्रीची बिले तयार केली. ही खोटी बिले जीएसटी पोर्टलवर अपलोड करून ओम ट्रेडर्स" या फर्मला आर्थिक फायदा करून दिला. या फसवणुकीतून आरोपींनी फिर्यादींच्या व्यवसायाच्यानावावर ३.२८ कोटींची थकबाकी दाखवून ही रक्कम हडप केली.
कर सल्लागार वीरेंद्र कुमार पाटीलला २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. शिवाय त्याची पत्नी प्रियांका वीरेंद्र कुमार पाटील हिच्या नावाने फर्म असल्याने तिची देखील कसून चौकशी करीत आहोत. असे गोकुळ शिरगाव पोलिसांकडून समजलें.
आरोपी वीरेंद्रकुमार पाटील यांचा फसवणुकीचा पूर्वेतिहास असून, त्यांच्यावर २०१९ मध्येही गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वी आरोपी वीरेंद्रकुमार पाटील याने २०१९ मध्ये व्हॅट भरल्याच्या खोट्या पावत्या दाखून मंगल निर्मळे या उद्योजिकेची फसवणूक करून पावणेदोन कोटीला गंडा घातला होता.त्याने बनावट पावत्या, खोटी स्टेटमेंट दाखवून फसवणूक केली होती.
तसेच वीरेंद्रकुमार पाटील हा महालक्ष्मी कास्टिंग सोलुशन या फर्मचा कर सल्लागार म्हूणन काम करीत होता. त्याने 2014 ते 2017 यावेळी कागल एमआयडीसी मध्ये पावडर कोटिंग नावाचा हॉस्पिटल चे फर्निचर बनवण्याचा राजेंद्र कृष्णाजी कुलकर्णी, यांचा कारखाना आहे. तेथे तो अकौंटंट म्हणून काम करीत असताना खोटी व बनावट चलने बनवून सदर उद्योजकाची एक कोटीची फसवणूक केली होती.
दरम्यान केंद्रीय जीएसटी ,कोल्हापूर आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने ही बाब उघडकीस आणल्यानंतर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने सदर कर सल्लागाराचे आणखीन कारनामे उघडकीस येतील अशी अपेक्षा आहे.