केंद्रीय अर्थमंत्री यांना दिलेल्या अर्थसंकल्पपूर्व मेमोरँडममध्ये, रत्ने आणि सोने, चांदी दागिन्यांवरचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सध्याच्या ३ टक्क्यांवरून १ टक्क्यांपर्यंत कमी करावा, अशी अपेक्षा ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) ने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत त्यांच्या टिकाऊ आणि किफायतशीर गुणांची पूर्ण ओळख करून प्रयोगशाळेतल्या हिऱ्यांसाठी सवलतीचा जीएसटी दर लागू करण्याची तातडीने गरज आहे, असेही जीजेसीने म्हटले आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेत रत्न आणि आभूषण क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, निर्यात, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक वारसा जतन याद्वारे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. हा एक प्रमुख रोजगार निर्माता आणि भारताचा दुसरा सर्वात मोठा परकीय चलन कमावणारा व्यवसाय (एफईई) देखील आहे. तथापि, उद्योगासमोर क्लिष्ट कर आकारणी, कठोर अनुपालन आवश्यकता आणि वित्तपुरवठ्यात मर्यादित लवचिकता यासह अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, जीजेसीने भारतातील रत्ने आणि दागिने क्षेत्राचा पूर्ण क्षमतेचा वापर व्हावा या दृष्टीने कार्यवाही करण्यायोग्य शिफारसींची रूपरेषा देणाऱ्या तपशीलवार निवेदनात म्हटले की,दागिने क्षेत्र हे लहान आणि मध्यम उद्योग यांनी बनलेले आहे असून ज्वेलरी उद्योगासाठी कोणतेही समर्पित मंत्रालय नाही हे लक्षात घेता, सरकारने राज्यवार नोडल कार्यालये स्थापन करून आणि केवळ ज्वेलरी क्षेत्रासाठी केंद्रीय मंत्री नियुक्त करण्याची विनंती केली आहे.