जीएसटी व्याज व दंड माफी अभय योजने अंतर्गत, जुलै 2017 ते मार्च 2020 दरम्यानच्या कर कालावधीसाठी कलम 73 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या डिमांड नोटिस,स्टेटमेंट किंवा ऑर्डरसाठी, करदात्यांनी फॉर्म GST SPL-01 किंवा SPL-02 मध्ये अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यानुसार जीएसटी पोर्टलवर, फॉर्म GST SPL-02 GST पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. GST पोर्टलवर GST SPL-01 फॉर्म लवकरच उपलब्ध होईल असे जीएसटी नेटवर्क ने कळवले आहे.
1) SPL-02 इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्याची प्रक्रियेची तपशीलवार लिंक पुढे आहे.
2) जीएसटी नेटवर्क ने यापूर्वी 08.11. 2024 रोजी अभय योजने बद्दल निर्देश जारी केले होते,याची लिंक पुढे दिली आहे:
3) अभय योजनेशी संबंधित कोणतीही अडचण येत असल्यास पुढील संकेत स्थळावर तक्रार केली जाऊ शकते.
1.Form SPL-02 भरण्याची पद्धत 2.दिनांक 8.11.2024 चे निर्देश 3.अभय योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणीसाठी तक्रार करण्यासाठी लिंक