विशिष्ट वस्तूंची जीएसटी चोरी आता "ट्रॅक अँड ट्रेस " प्रणाली द्वारे शोधून काढणार- जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय

GST 4 YOU
 
 जीएसटी चुकवेगिरी  आता  जास्त काळ लपून राहणार नाही, आता  नव्या प्रणालीद्वारे ही बाब त्वरीत उघडकीस आणली जाईल. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मागील  शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या  55 व्या बैठकीत करचोरी रोखण्यासाठी काही वस्तूंसाठी 'ट्रॅक अँड ट्रेस' प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . 
    या प्रणालीच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना, सूत्रांनी सांगितले की, ट्रॅक अँड ट्रेस अंतर्गत, ज्या वस्तू किंवा कमोडिटी यामध्ये करचुकवेगिरीची मोठी शक्यता आहे, त्याच्या पॅकेट्स वर विशिष्ट चिन्ह लावले जाईल. जेणेकरून यामुळे पुरवठा साखळीत त्यां वस्तूंचा मागोवा घेणे सोपे होईल. असे केल्याने करचोरी वर नियंत्रण मिळवून  कर चोरी करणारे  कायद्याच्या कक्षेत आणले जातील.