कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी ॲड प्रल्हाद कोकरे यांची तर उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे.
अधिकृत घोषणेला सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असली तरी गुरुवारी झालेल्या या निवडणुकीत निर्णय प्रक्रिया पार पडली.
ॲड. कोकरे, सहकारी बँकिंग क्षेत्रातील दिग्गज नाव असून , डिसेंबर 2004 पासून ते बँकेच्या संचालक मंडळाचा एक भाग आहेत.त्यांनी यापूर्वी 2019-2020 आणि 2020-2021 मध्ये उपाध्यक्षपद भूषवले होते. सहकारी संस्थांचे सेवानिवृत्त सहनिबंधक, कोकरे हे गेल्या दोन दशकांपासून विविध मंडळ समित्यांमध्ये सक्रियपणे योगदान देत आहेत, त्यांनी बँकेला प्रभावशाली नेतृत्व दिले आहे.
सीए यशवंत कासार हे एक प्रख्यात व्यावसायिक,आर्थिक सल्लागार असून त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष पद समर्थ पणे सांभाळले आहे.. फेलो चार्टर्ड अकाउंटंट, सर्टिफाइड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर (सीआयएसए), आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल (पीएमपी), असलेल्या कासार यांचे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील योगदान सर्वत्र ओळखले जाते. ते सध्या द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) चे प्रादेशिक परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत आणि यापूर्वी त्यांनी WIRC च्या पुणे शाखेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळात रसिका गुप्ता, सुरेखा जोशी, प्रवीणकुमार गांधी, अजित गिजारा, सुब्रमण्यम संथानम, घनश्याम अमीन, सचिन आपटे, अरविंद तावरे, बाळासाहेब साठे, अनुश्री माळगावकर आणि रेखा पोकळे यांचा समावेश आहे.
118 वर्षे जुनी असलेली कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असून बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षात 384 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.