चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) तसेच अतिरिक्त एफएसआय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगर पालिकांकडून शुल्क वसूल केले जाते ,या शुल्कावर रिव्हर्स चार्जच्या आधारावर जीएसटी आकारणीचा मुद्दा दोन दिवसापूर्वी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ५५ व्या बैठकीत जैसलमेर येथे चर्चेला आला .
मात्र या रकमा महानगरपालिका/ नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण यांचेशी संबंधित असल्याने केंद्र सरकारच्या सुचने नुसार हे प्रकरण आधिक तपासणी साठी पुढे ढकलण्यात आले.
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर जारी प्रसिद्ध पत्रकात ही माहिती देण्यात आली.