ईडी कडून 640 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक संबंधी दोन चार्टर्ड अकाउंटंट सह एका क्रिप्टो करन्सी ट्रेडरला अटक -कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांच्या वर हल्लाचा प्रयत्न

GST 4 YOU

 अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सायबर फसवणूक तपासाशी जोडलेल्या 640 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग योजनेच्या संबंधात दोन चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि एका क्रिप्टोकरन्सी ट्रेडरला अटक केली आहे.
    28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान, ईडीने दिल्ली, गुरुग्राम, जोधपूर, झुंझुनू, हैदराबाद, पुणे आणि कोलकाता येथे 13 ठिकाणी शोध घेतला. या ऑपरेशन्समुळे 47 लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि 1.3 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली.
   ED च्या तपासात काही चार्टर्ड अकाउंटंट्स (CAs), कंपनी सेक्रेटरी (CS) आणि क्रिप्टो ट्रेडर्स यांचा संबंध उघड झाला आहे, जे कट कारस्थाने करून गुन्ह्यातील पैसे लाँडर करण्यासाठी पद्धतशीर स्वरूपात काम करत होते.
    दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआर मधून तपास सुरू होऊन ऑनलाइन सट्टेबाजी, जुगार, बनावट अर्धवेळ नोकरीच्या ऑफर आणि संशयास्पद व्यक्तींना लक्ष्य करणाऱ्या फिशिंग योजना यासारख्या घोटाळ्यांचा समावेश असलेल्या मोठ्या सायबर फसवणुकीचा यात समावेश आहे
    कथित मास्टरमाइंड सीए अशोक कुमार शर्माचा भाऊ राधे श्याम शर्मा याला छाप्यादरम्यान ईडी अधिकाऱ्यांना अडथळा आणल्याबद्दल, धक्काबुक्की व मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. फार्महाऊसवर केलेल्या कारवाईत गंभीर पुरावे जप्त करण्यात आले, ज्यात गुन्ह्यातील दस्तऐवज, चेक बुक्स, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, डिजिटल स्वाक्षरी आणि गुप्त क्रिप्टोकरन्सी वॉलेट चालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेडेन्शियल याचा समावेश आहे.
    अंमलबजावणी निदेशालयाच्या तपासात एक सुनियोजित गुन्हेगारी नेटवर्क उघडकीस आले आहे, ज्यातून सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर पैसे लाँडर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान यांचा गैरवापर उघड झाला आहे. घोटाळ्याचे संपूर्ण खोदकाम करण्यासाठी पूर्णपणे गुंतलेल्यांना न्याय मिळावा यासाठी अधिकारी जप्त केलेल्या पुराव्याचे विश्लेषण करत आहेत.