नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या 55 व्या बैठकीतील निर्णयानुसार रेस्टॉरंट सेवेच्या जीएसटी दरात बदल प्रस्तावित केले असून त्यात सध्याचे दर आणि सवलत अधिसूचनेतून डिक्लेअरड टॅरीफ ची (घोषित दर) व्याख्या वगळणे आणि स्पेसिफाइड प्रिमायसेसच्या (विनिर्दिष्ट जागा) व्याख्येमध्ये योग्य ती सुधारणा करणे यांचा यात समावेश आहे.
तसेच हे प्रस्तावीत दर चालू आर्थिक वर्षासाठी, कोणत्याही पुरवठ्याच्या वास्तविक मूल्याशी जोडण्यासाठी होटेल द्वारे प्रदान केलेल्या निवासाचे एकक आणि रेस्टॉरंट वरील जीएसटीचा दर हा मागील आर्थिक वर्षात अशा हॉटेल्समधील सेवेच्या युनिट्सच्या ‘पुरवठ्याच्या मूल्यावर’ अवलंबून असेल. म्हणजे मागील आर्थिक वर्षात निवासाच्या कोणत्याही निवासी युनिटसाठी रु. 7,500 पेक्षा जास्त रक्कम असेल तर चालू आर्थिक वर्षात 18% आयटीसी सह असा दर असेल इतर प्रकरणात 5% आयटीसी शिवाय असा दर असेल.
पुढे, हॉटेलमधील रेस्टॉरंट सेवेवर ITC सह 18% दराने कर भरण्याचा पर्याय हॉटेलने निवडल्यास, त्या प्रभावासंबंधी घोषणापत्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस किंवा नवीन नोंदणी प्राप्त झाल्यावर घोषणा करून पर्याय निवडता येतील.
कोणत्याही संक्रमण कालीन अडचणी टाळण्यासाठी ही पद्दती 01.04.2025 पासून प्रभावी असेल.