वित्तीय वर्ष 2023-24 करिता फॉर्म जीएसटीआर-9 आणि फॉर्म जीएसटीआर-9 सी विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असून संबंधितानी ते नियत मुदतीत सादर करावे असे आवाहन सरकारने केले आहे.
फॉर्म जीएसटीआर - 9 करिता पात्र करदाते
सर्व जीएसटी करदाते ज्यांची एकूण वार्षिक उलाढाल रु. 2कोटी (वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये) पेक्षा जास्त आहे .खालील वगळून
*इनपुट सर्व्हिस वितरक
*कॅज्युअल टॅक्सेबल व्यक्ती
*टीडीएस डिडक्टर
*टीसीएस कलेक्टर
*नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन
# फॉर्म जीएसटीआर - 9 सी करिता पात्र करदाते
असे करदाते ज्यांची एकूण वार्षिक उलाढाल रु. 5 कोटी (वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये) पेक्षा जास्त आहे. त्यांनी फॉर्म जीएसटीआर 9 विवरण पत्रासह फॉर्म 9 सी मधील स्वयंप्रमाणित रिकंसिलेशन स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे.
फॉर्म जीएसटीआर-9 आणि फॉर्म जीएसटीआर 9 सी उशिराने दाखल केल्यास विलंब शुल्क आकारण्यात येते.