शनिवारी जीएसटी परिषदेची राजस्थानमधील जैसलमेर येथे बैठक झाली. ही 55 वी बैठक होती. त्यात इलेक्ट्रिक व्हेईकल्ससह जुन्या कारच्या विक्रीवर करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयीचा निर्णय घेतला आहे. पूर्वी पण या विक्रीवर जीएसटी लागू होता. तो 12 टक्के होता. आता विक्रीवर 18 टक्के जीएसटी आकारल्या जाणार आहे.
राजस्थानच्या जैसलमेर या शहरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले.
अर्थात जीएसटी फक्त त्या मूल्यावर लागू आहे जे पुरवठादाराचे मार्जिन आहे .म्हणजे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातील फरक ( जर घसारा दावा केला असेल तर असे अवमूल्यन केलेले मूल्य) आणि वाहनाच्या मूल्यावर नाही. तसेच, नोंदणी नसलेल्या व्यक्ती बाबतीत ते लागू होत नाही.