जीएसटी दराच्या १२ टक्के 'स्लॅब'मध्ये कपात करण्याबाबत मंत्री गटाची चर्चा

GST 4 YOU


जीएसटी दरांच्या तर्कसंगत करण्या वर गठित मंत्र्यांच्या गटाने १०० हुन अधिक अधिक वस्तूंवरील कर दरांमध्ये बदलावर चर्चा केली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी काही वस्तूंवरील कराचा दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्याचा मुद्दाही त्यात समाविष्ट करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
    मंत्री गटाची पुढील बैठक २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. मागील बुधवारी झालेल्या सहा सदस्यीय मंत्रिगटाने  १२ टक्के 'स्लॅब मध्ये वैद्यकीय आणि औषधी वस्तूंवरील कर दरात कपात करण्याचा मुद्दा उपस्थित केला आणि पुढील महिन्यात झालेल्या बैठकीत त्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मंत्र्यांच्या गटाने अशा वस्तूंवरील कर दर कमी केल्यामुळे महसूल नुकसान भरून काढण्यासाठी सध्याच्या २८ टक्के जीएसटी अधिक सेस वरून  काही वस्तूंवरील कर दर वाढवण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली. सध्याच्या, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही चार-स्तरीय कर रचना आहे. त्यात ५ ,१२,१८ आणि २८ टक्के स्लॅब' आहेत. तथापि, जीएसटी कायद्यानुसार, वस्तू आणि सेवांवर ४० टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो. २०२४ मध्ये जीएसटी अंतर्गत सरासरी कर दर ११.५६ टक्क्यांवर आला आहे. 
 या चर्चे वेळी असे सुचवले गेले की, जीएसटी कौन्सिलच्या २३ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ज्यामध्ये १७८ वस्तूंवरील कर दर २८ टक्क्यांचा 'स्लॅब' काढून टाकण्यात आला होता. यामुळे अधिक महसूल वाढण्यास मदत होईल आणि वस्तूंवरील कराचा दर ५ टक्क्यांपर्यंत कमी करून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.मंत्रिगट २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत आपल्या सदस्यांच्या मतांवर चर्चा करेल आणि आपल्या शिफारशी जीएसटी परिषदेसमोर ठेवेल.