जीएसटी पथकाचा बड्या बेकरी व्यवसायावर छापा.. मोठी कर चोरी उघड

GST 4 YOU


राज्य जीएसटी पथकाने नुकताच अमरावती शहरात एका बड्या बेकरी व्यवसायिकावर संशयित जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी छापा टाकला. या उद्योगाशी संबंधित दोन कारखाने व तीन दुकानांची चौकशी सुरू आहे.
करमुक्त बेकरी उत्पादनांतर्गत जीएसटी देय उत्पादनांचे चुकीचे वर्गीकरण करून संशयास्पद करचोरी, विक्री केलेल्या करमुक्त वस्तूंवर इनपुट टॅक्स क्रेडिटचे चुकीचे दावे आदी मुद्द्यांचा समावेश चौकशीत आहे. 

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्णय आदेशांमध्ये एक कोटींहून अधिकची अतिरिक्त जीएसटी मागणी आधीच वाढलेली आहे. यासंदर्भात संपर्क साधला असता कायद्यानुसार वसुलीची कार्यवाही सुरू असल्याचे जीएसटी सूत्रांनी सांगितले.