मा.सुप्रीम कोर्टाने रॉयल्टी पेमेंट संबंधी निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनर्विलोकन याचिका फेटाळल्या

GST 4 YOU
   
मा.सुप्रीम  कोर्टाने अलीकडेच रॉयल्टी पेमेंटच्या वर्गीकरणासंबंधीच्या आधीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक पुनर्विलोकन याचिका  फेटाळून लावल्या. कर्नाटक लोह आणि पोलाद उत्पादक संघटना विरुद्ध खनिज क्षेत्र विकास प्राधिकरण व इतर या  प्रकरणात हा निर्णय आला आहे.
आपल्या आदेशात, मा.सर्वोच्च न्यायालयाने आपला मूळ दृष्टिकोन कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाच्या नियम, 2013 अंतर्गत पुनरावलोकनासाठी रेकॉर्डमध्ये कोणतीही त्रुटी दिसून आली नाही.
नुकतेच  "रॉयल्टी हा  कर नाही",असा ऐतिहासिक निर्णय देताना न्यायालयाने नमूद केले होते की रॉयल्टी ही  खनिजे आणि नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननासाठी राज्याला दिलेली कंत्राटी देयके आहेत आणि महसूल निर्मितीच्या उद्देशाने लादलेल्या करांपेक्षा वेगळे आहेत.रॉयल्टी देयके ही राज्याच्या संसाधनांच्या शोषणासाठी मूलत: भरपाई असते, जी भाडेपट्टा किंवा कराराद्वारे दिली असेही या निर्णयाने स्पष्ट केले होते.