पुण्यात रु.561.58 कोटीच्या बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचा पर्दाफाश-डीजीजीआय ची मोठी कारवाई

GST 4 YOU

केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (DGGI), पुणे झोनल युनिटने, रु.561.58 कोटीचा मोठा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळा उघडकीस आणला आहे. या बोगस व्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार मोहम्मद रियाझ उद्दीन याला हैदराबाद, तेलंगणा येथे अटक करण्यात आली आहे.
डीजीजीआय अधिकाऱ्यांनी, गुप्त माहितीवर काम करत, मेसर्स एनएल ट्रेडर्स या पुणेस्थित कर दात्याने केलेल्या बोगस व्यवहार करून आयटीसीचा खोटा दावा केल्याचे आढळून आले होते.पुढील पडताळणीवरून असे दिसून आले की यात गुंतलेली एच बी ट्रेडिंग कंपनी, हैदराबाद ही  फर्म, तिच्या घोषित पत्त्यावर अस्तित्वात नाही.
     ई-वे बिल आणि कॉल रेकॉर्डच्या IPDR/ CDR विश्लेषणासह तपशीलवार तपासणी, मेसर्स एचबी ट्रेडिंग आणि 57 इतर काल्पनिक कंपन्यांसाठी ई-वे बिले रियाझ उद्दीनने  दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 8 ऑक्टोबर 2024 रोजी त्याच्या निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात अंदाजे 2,600 बनावट पावत्या, विविध कंपन्यांचे पाच रबर स्टॅम्प आणि सक्रिय कंपन्यांचे आयडी आणि पासवर्ड असलेले पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले. त्याच्या आवारात सापडलेले लॅपटॉप आधुनिक  सॉफ्टवेअरने सुसज्ज होते, ज्याचा वापर एकूण 58 संस्थांसाठी बनावट पावत्या आणि ई-वे बिल तयार करण्यासाठी केला जात होता.
   रियाझ उद्दीनने वस्तू किंवा सेवांचा कोणताही प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट पावत्या आणि ई-वे बिलांचे अत्याधुनिक नेटवर्क तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे रू.561.58 कोटी ची आयटीसीची फसवणूक करून सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान केले. आधिक तपास पुणे डीजीजीआय अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.