प्राधान्य स्थान शुल्क (Preferential Location Charges) या वरील जीएसटीचा दर बांधकाम सेवा प्रमाणेच – घर बांधणी उद्योगाला दिलासा-जीएसटी परिषदेचा निर्णय

GST 4 YOU

  जीएसटी परिषदेचा  ५४ बैठकीतील निर्णया नुसार बांधकाम पुर्णत्व प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी निवासी/ व्यावसायिक/ औद्योगिक कॉम्प्लेक्सच्या बांधकाम सेवांच्या मोबदल्याबरोबर बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांकडून घेतलेले प्राधान्य स्थान शुल्क (Preferential Location Charges) हे संमिश्र पुरवठ्याचा एक भाग असून तेथे बांधकाम सेवांचा पुरवठा ही मुख्य सेवा आहे आणि प्राधान्य स्थान शुल्क हे नैसर्गिकरित्या त्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे सदर शुल्क हे  मुख्य पुरवठा असलेल्या  बांधकाम सेवेच्या  दराने कर आकारणी साठी पात्र आहे. सरकारने या संबंधी प्रसिद्धी पत्रक  जारी केले  आहे. 
थोडक्यात बांधकाम सेवांचा भाग म्हणून प्राधान्य स्थान शुल्कावर वर लागू होणारे जीएसटी दर  हे परवडणाऱ्या निवासी घरांकरिता 1️% , इतर निवासी घरांकरिता 5️%  आणि व्यावसायिक मालमत्तेसाठी 1️2️% असतील.   याच्या परिणामी  अंतिमताः ग्राहकासाठी किंमती कमी होणे अपेक्षित आहे .
तसेच प्राधान्य स्थान शुल्क (पीएलसी) या सह संपूर्ण मोबदला हा बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र जारी केल्यानंतर भरल्यास यावर  जीएसटी लागू होणार नाही.