सोमवारी झालेल्या 54 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सरकारने नमकीन आणि तत्सम खाद्य उत्पादनांच्या जीएसटी कर दरात कपात करण्याचा निर्णय घेतला, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केली. अशा उत्पादनांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याचे त्यानी सांगीतले.
"नमकीन, एक्सट्रूडेड, विस्तारित चवदार खाद्यपदार्थांवर जीएसटी दर 18 % वरून ते 12 टक्क्यांपर्यंत कमी केला जात आहे, असे सांगून अर्थमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की जीएसटी दर पूर्वलक्षी प्रभावाने नव्हे तर येथून पुढे अधिसूचना जारी झाल्या नंतर कमी करण्यात येतील.
एक्सट्रूजन प्रक्रियेचा वापर करून बनवलेल्या स्नॅक्सवर 18 टक्के कर आकारला जाईल. तथापि, भुजिया सारख्या इतर स्नॅक्स आणि तत्सम पदार्थांवर 12 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो.
तसेच न तळलेल्या किंवा न शिजवलेल्या स्नॅकच्या एक्सट्रूझनद्वारे केलेल्या उत्पादनावर 5 टक्के जीएसटी दराने कर आकारला जातो.