जीएसटी कायदा कलम १६(४) तरतुदी तून अखेर करदाते सुटले....संबंधीत अधिसूचना सरकार कडून जारी..

GST 4 YOU


जीएसटी परिषदेच्या ५३ व्या बैठकीतील निर्णयानुसार बहु चर्चित अशा जीएसटी कायदा , २०१७ च्या कलम १६ (४) च्या अटी शिथिल करण्या संबंधीत अधिसूचना क्र १७/२०२४ -केंद्रीय कर दिनांक २७.०९. २०२४ रोजी जारी झाल्याने उद्योग, व्यापार विश्व व जीएसटी कर दाते यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण या विषयावरील हजारो कर विवाद वेगवेगळ्या प्राधीकार्यांसमोर प्रलंबीत असून शेकडो कोटींच्या कर मागणीच्या रकमा यात समाविष्ट आहेत. या अधिसूचनेमुळे मुळे आता सदर कारणे दाखवा सूचना/ अपिले निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
व्यापार आणि उद्योग जगताकडून  जीएसटी कायदा, २०१७  च्या कलम १६ (४) मध्ये नमूद केलेल्या कालमर्यादा शिथिल करण्याची  मागणी  सरकार कडे लावून धरण्यात आली होती.
जीएसटीची सुरुवातीची वर्षे म्हणजे आर्थिक वर्ष २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीसाठी ही सवलत देण्यात आली आहे.