अनोंदणीकृत व्यक्तीकडून व्यावसायिक मालमत्ता भाड्याने घेणाऱ्या करदात्यांना आता रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम खाली जीएसटी भरावा लागणार

GST 4 YOU

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने 9 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 54 व्या बैठकीत महसूल गळती रोखण्यासाठी, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (RCM) अंतर्गत नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीकडून व्यावसायिक मालमत्ता भाड्याने घेणाऱ्या कर दात्या व्यक्तींना जीएसटी भरण्यासाठी जबाबदार ठरवण्याचा निर्णय घेतला.
   नोंदणीकृत नसलेल्या पुरवठादाराकडून व्यावसायिक मालमत्तेचे भाडे रिव्हर्स चार्ज अंतर्गत आणण्याच्या या निर्णयामुळे नोंदणीकृत करदात्यांच्या अनुपालनात वाढ होईल कारण यासाठी भाडेतत्त्वावरील त्यांच्या व्यवसायाच्या सर्व ठिकाणी जीएसटी दायित्व निश्चित करणे आवश्यक होणार आहे. याची अधिसूचना लवकरच अपेक्षित आहे.