५४ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून १६६.९१ कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक करणाऱ्या आरोपी वीरेंद्र कुमार उर्फ कल्पेश कुमारला केंद्रीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालय डीजीजीआय च्या पुणे युनिटने राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात अटक केली.त्याचे वय अवघे २६ वर्षे आहे.
जयपूर मेट्रोपॉलिटन कोर्टात डीजीजीआय पुणे युनिटचे वरिष्ठ तपास अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी त्याला हजर करून ट्रान्झिट रिमांडवर पुण्याला पुढील कारवाई साठी आणले.
या प्रकरणात यापूर्वी डीजीजीआयच्या पुणे युनिटने दिनेश कुमार नावाच्या आरोपीला जयपूर येथून अटक केली होती. त्याच्या प्रमाणे वीरेंद्र कुमार ने ही बनावट आधार कार्ड चा वापर करून 54 बोगस कंपन्या स्थापन करून जीएसटी फसवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.