सोमवारी झालेल्या जीएसटी परिषदे च्या 54 व्या बैठकीतील निर्णयानुसार आता अनोंदणीकृत विक्रेत्याकडून घेतलेल्या मेटल स्क्रॅप वर नोंदणीकृत जीएसटी करदात्याला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम) खाली जीएसटी भरावा लागणार आहे. त्या अनोंदणीकृत विक्रेत्याची थ्रेशोल्ड मर्यादा पार पडेपर्यंत नोंदणीकृत कर दाता आरसीएम खाली कर भरणा करेल.
तसेच मेटल स्क्रॅप च्या व्यवहारात व्यवसाय टू व्यवसाय व्यवहार म्हणजेच बी टू बी प्रकरणात आता करदाता हा त्याच्या पुरवठा दाराचा दोन टक्के दराने जीएसटी उद्गम कर कपात (टीडीएस ) करेल.
ही नवीन पद्धती स्क्रॅप व्यवसायातील कर चुकवेगिरी टाळण्याच्या उपाययोजनाचा भाग असल्याचे जाणकारांचे मत आहे.