पुणे केंद्रीय जीएसटी तर्फे जीएसटी विषयी ताज्या बदलांची जनजागृती व्हावी या साठी प्रश्नमंजुषा "Qu-rukshetra- द इंडिया क्विझ "यशस्वीरित्या संपन्न झाली .याचा भाग म्हणून आणि २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील अलीकडील बदलांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी तसेच कॉर्पोरेट्समध्ये भारताबद्दलचे ज्ञान वाढवण्यासाठी, केंद्रीय जीएसटी पुणे यांनी गेल इंडिया च्या सहकार्याने प्रश्नमंजुषाचे ईशान्य सभागृह, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, विमान नगर, पुणे येथे आयोजन केले होते. केंद्रीय जीएसटी, पुणे -I प्रधान आयुक्त मिहिर कुमार हे प्रमुख पाहुणे तर , गेल इंडिया, कार्यकारी संचालक विवेक वठोडकर, हे सन्माननीय पाहुणे होते. केंद्रीय जीएसटी , आयुक्त (अपिल्स ) , पुणे दिनेश भोयर, हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. आयोजन समितीत अप्पर आयुक्त, राहुल गावंडे, अप्पर आयुक्त कोमथी के., सहआयुक्त शिवकुमार साळुंखे, सहआयुक्त अन्वेश, यांचा समावेश होता. कथक च्या विविध मुद्रांनी जीएसटी च्या विविध बाबींची माहीती “टैक्स-मुद्रा” या नृत्याने देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष जोशी, सहायक निदेशक यांनी केले.
सहभागी संघांनी भारताच्या अनेक पैलूंवर उत्कृष्ट ज्ञान आणि कौशल्य प्रदर्शित केले. या यशस्वी कार्यक्रमाने ज्ञान आणि स्पर्धेच्या क्षेत्रात भागीदारी आणि सहकार्य किती महत्त्वाचे असते हे दाखवून दिले.