ऑगस्ट 24 चा जीएसटी महसूल मागील वर्षी पेक्षा 10% ने वाढला - वस्तू आणि सेवाकर संकलन आणि इतर संबंधित माहिती आता जीएसटी पोर्टलवर बारा महिने उपलब्ध

GST 4 YOU
   
     माहे ऑगस्ट 2024 चे जीएसटी संकलन स्थूल आधारावर मागील वर्षी पेक्षा 10% ने वाढून जवळपास रु. 1,74,962 कोटी झाले, जे मागील ऑगस्ट 23 मध्ये 1,59,069 कोटी होते. परंतु रिफंड रकमे ने निव्वळ कर महसूल कमी झाला, असे रविवारी सरकारने ने जाहीर केलेल्या नवीनतम आकडेवारीवरून दिसून आले.
   आगामी उत्सव हंगामाच्या प्रारंभी संकलनातील 10% वाढ ही सेवा आणि वस्तू यांचा वापर मजबूत होतो आहे असे दर्शविते आणि येत्या सणाच्या महिन्यांतच त्यात आणखी सुधारणा होईल असा विश्वास जाणकारांना वाटतो आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षासाठीचे संकलनाचे उद्दिष्ट साध्य केले जाईल अशी अपेक्षा आहे. वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाशी संबंधित डेटा किंवा माहिती आता जीएसटी पोर्टल https://www.gst.gov.in वर ‘बातम्या आणि अपडेट्स’ विभागांतर्गत उपलब्ध असेल:
त्याचप्रमाणे या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात 'जीएसटी आकडेवारी' अंतर्गत वैयक्तिक घटकांचे विभाजन आणि जीएसटी संकलनाचे राज्यनिहाय तपशील तसेच जीएसटी संकलनाने नोंदवलेलया विक्रमाच्या नोंदी असलेला इतर संबंधित डेटा देखील 2017 पासून नियमितपणे अद्ययावत केला जात आहे.