मा.मद्रास हायकोर्टाने जीएसटी कायद्याच्या कलम 16(4) प्रकरणी जीएसटी कायद्यातील नवीन बदलांचा फायदा करदात्यांना देण्याचे दिले आदेश

GST 4 YOU


मा.मद्रास हायकोर्टाने मे.सागर ब्रश इंडस्ट्रीज, मदुराई विरुद्ध राज्य कर अधिकारी, मदुराई W.P. (MD) No. 20773 of 2023 या प्रकरणी जीएसटी कायद्याच्या कलम 16(4) प्रकरणी आयटीसी नाकारण्याची प्रकरणे मूळ निर्धारण अधिकाऱ्याकडे कडे पाठवताना , वित्त कायदा, 2024 अंतर्गत  पुनरावलोकनाचे आदेश दिले.मा.न्यायालयाने असे नमूद केले की या बाबतीत, वित्त (क्र.2) विधेयक, 2024 चे कलम 114 आणि 146 मधील प्रस्ताव स्वीकारले जाऊन आता  वित्त कायदा, 2024 पारित झाला आहे. या तरतुदींचा लाभ संबंधित याचिकाकर्त्यांना दिला जाऊ शकतो
       मा. मद्रास हायकोर्टाने जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कायदा, 2017 च्या कलम 16(4) अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) नाकारल्याचा समावेश असलेल्या अनेक रिट याचिका पुन्हा नव्याने पुनरावलोकनासाठी कर निर्धारण अधिकारी  यांच्याकडे पाठवल्या. वित्त कायदा, 2024 च्या तरतुदींच्या अनुषंगाने मा. न्यायमूर्ती यांनी निर्णय दिला की संसद स्वतःच कर दात्यांच्या बचावासाठी आलेली असल्याने,  मूळ प्राधिकरणाने दिलेले  आदेश तसेच अपील प्राधिकरणाने दिलेले आदेश रद्द करण्यात येऊन रिट याचिकांच्या संबंधित  निर्धारणा अधिकाऱ्यानी  वित्त कायदा, 2024 नुसार  गुणवत्तेवर नवीन आदेश पारित करण्यासाठी प्रकरणे निर्धारणा अधिकाऱ्याकडे परत पाठविली .
या  प्रकरणात, कलम 114 आणि 146 मधील प्रस्ताव वित्त अधिनियम, 2024 मध्ये वित्त (क्रमांक 2) विधेयक, 2024 स्वीकारले गेले आणि लागू केले गेले, या तरतुदींचा लाभ संबंधित याचिकाकर्त्यांना दिला जाऊ शकतो असेही न्यायालयाने नमूद केले.