जीएसटी मध्ये आयटीसी साठी मालाची भौतिक हालचाल सिद्ध करण्यासाठी माल भाडे पावती, वितरण पावती आणि टोल पावत्या आवश्यक आहेत: मा.अलाहाबाद उच्च न्यायालय

GST 4 YOU

मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मे.अनिल राईस मिल या प्रकरणात मालवाहतूक भाडे पावती,  डिलिव्हरी पावती आणि टोल पावत्या ही वस्तूंची भौतिक हालचाल सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे असून त्याच्या अभावी वस्तू आणि सेवा कर विभागाने जारी केलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला कारण याचिकाकर्ता ही कागदपत्रे आणि जीएसटीआर 2ए आहे सादर करण्यात अयशस्वी झाला.

    खंडपीठाने  मे.आयुक्त, वाणिज्य कर वि. रामस्वामी फूड्स ली चा संदर्भ दिला जिथे असा निर्णय दिला गेला की आयटीसी मिळवण्यासाठी  वस्तूंची वास्तविक हालचाल आणि व्यवहारांचे खरे पण स्थापित करण्याची प्राथमिक जबाबदारी कर दात्याची आहे. या पुराव्यांशिवाय आयटीसीचा लाभ दिला जाऊ शकत नाही. जीएसटी कायद्याच्या कलम 16 आणि कलम 74 अन्वये, वस्तूंची वास्तविक भौतिक हालचाल सिद्ध करण्याचा भार कर दात्यावर आहे, असे न्यायालयाने मान्य केले. या अतिरिक्त पुराव्यांचा अभाव असल्यास केवळ कर चलन, ई-वे बिले आणि बँकिंग चॅनेलद्वारे पेमेंट पुरावे सादर करणे पुरेसे नाही.
परिणामी, मा.अलाहाबाद उच्च न्यायालयाने रिट याचिका फेटाळून लावली, जीएसटी विभागाच्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.