प्रत्यक्ष जीएसटी कर चुकवे गिरी शोधून काढण्या वर आधिक लक्ष केंद्रित करा: सीबीआयसी अध्यक्षांचे जीएसटी अधिकाऱ्यांना निर्देश

GST 4 YOU

"विविध विषयांचा अर्थ (Interpretaion) आणि सामान्य उद्योग व्यवसायात अवलंबली जात असलेली पद्धती" या वर  भर देण्या ऐवजी "प्रत्यक्ष कर चुकवे गिरी " शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर केंद्रीय आणि राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी भर द्यावा असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) चे प्रमुख संजय अग्रवाल यांनी सांगितले. ते राज्य आणि केंद्रीय जीएसटी विभागाच्या अंमलबजावणी  शाखा  प्रमुखांची दुसरी राष्ट्रीय परिषद मंगळवारी राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी बोलत होते.
     संजय अग्रवाल यांनी जीएसटी प्रणाली जपण्यासाठी  अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणानी  कर चोरी करणाऱ्यांच्या पद्धतींचा अभ्यास करून त्यावर मात करण्याची गरज असल्याचे सांगितले.
   केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी देखील "अंमलबजावणी कारवाई आणि व्यवसाय सुलभता" यांच्यात एक योग्य ते संतुलन राखण्याच्या गरजेवर भर देऊन अनावश्यक कृती टाळल्या पाहिजेत असे प्रतिपादन केले.
या परिषदे वेळी  राज्य जीएसटी आयुक्त, महाराष्ट्र यांनी जीएसटी अंमलबजावणी व्यवस्थापन प्रणाली (GEMS) चे सादरीकरण केले व ही प्रणाली  राज्यात लागू केल्याने अंमलबजावणी  क्रिया योग्यरित्या संचलित होतील व  समय बद्ध पद्धतीने त्या बंद केल्या जातील असे सांगून यामुळे या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली आहे हे स्पष्ट केले. तसेच कर मागणी वाजवी वेळेत अंतिम करून चुकवलेले कर वसूल होण्यावर भर दिला जात आहे असे सांगितले.