छोट्या जीएसटी कर दात्यांना मोठा दिलासा ! "कोणत्या” राज्य सरकार ने घेतला निर्णय |

GST 4 YOU

जीएसटी समस्यांना तोंड देत असलेल्या छोट्या कर दात्यांना दिलासा देण्यासाठी आसाम मंत्रिमंडळाने पावले उचलली.
राज्य कर विभागा कडून जारी करण्यात आलेल्या जीएसटी संबंधित नोटिसांमुळे छोट्या कर दात्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आसाम सरकारने निर्णय घेतला .
आसाम मंत्रिमंडळाने 2017-18 या आर्थिक वर्षा मधील 10,484 प्रकरणे आणि 2018-19 मधील 15,529 प्रकरणे आसाम जीएसटी कायदा, 2017 च्या कलम 161 अंतर्गत सुधारण्यास मान्यता दिली आहे. तीन महिन्याच्या आत जीएसटी नियमांनुसार या प्रत्येक प्रकरणाचे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यामध्ये सुधारणा केली जाईल.
तसेच 2019-20, 2020-21, आणि 2021-22 या आर्थिक वर्षांशी संबंधित नोटिसा ज्या बिग डेटा ॲनालिटिक्स सॉफ्टवेअर (BDAS) वापरून व्युत्पन्न केल्या गेल्या होत्या, त्या आता नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार हाताळल्या जातील. ज्या प्रकरणांत कर रक्कम ₹5 लाख पुढे असेल तरच अशा प्रकरणांसाठीच नोटिसा जारी केल्या जातील.
नुकत्याच 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.