बोगस कंपन्यांद्वारे 76 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक -केंद्रीय जीएसटी, बडोदा II कडून उघड- दोघे अटकेत

GST 4 YOU

 केंद्रीय जीएसटी, बडोदा II आयुक्तालय, प्रतिबंधात्मक शाखेचे अधिकाऱ्यानी बोगस कंपन्यांद्वारे 76 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक करणाऱ्या एका सिंडिकेट चा पर्दाफाश केला असून लार्क वायर्स अँड इन्फो टेक लिमिटेडचे संचालक विकास लढा आणि अविनाश लढा यांना कथित फसवणूकीच्या गुन्ह्याबद्दल अटक केली आहे. हा गुन्हा केंद्रीय जीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 (1) (b), (c), (f) आणि (1) अंतर्गत अंतर्गत दंडनीय आहे.
केंद्रीय वस्तू व सेवा कर तथा उत्पादन शुल्क (CGST) विभागाने केलेल्या तपासात लार्क वायर्स अँड इन्फो टेक लिमिटेडने बोगस कंपन्या तयार करून वस्तूंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता इनव्हॉइस जारी केल्या, परिणामी फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)  फायदा घेऊन ते पुढे  पास केल्याचे उघड झालं आहे. बडोदा -II आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक विभागाने  अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या साखळीद्वारे बनावट पावत्या बनवण्याचे हे रॅकेट उघडकीस आणले आहे. संचालक  विकास लढा आणि अविनाश लढा हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. ते  पुण्यवा वायर्स केबल्स प्रायव्हेट लिमिटेड,  अटिविरा वायर्स केबल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि  अमरेखा कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापन पाहत होते. या कंपन्यांची उलाढाल वाढवण्यासाठी इनव्हॉइस आणि ई-वे बिले तयार करण्यात आली. तथापि, मालाची प्रत्यक्ष विक्री किंवा खरेदी झाली नाही आणि मालाची प्रत्यक्ष हालचाल नसल्याचे स्पष्ट झाले. कंपन्यांचे नेटवर्क आणि इतर तीन संबंधित कंपन्यांनी रु.76 कोटींचा चा आयटीसी घेवून पुढे पास केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. अधिक तपास केंद्रीय जीएसटी अधिकारी करत आहेत.