वित्त कायदा, 2024 मधील जीएसटी संबंधित तरतुदी, सप्टेंबर मधील जीएसटी परिषदेच्या नियोजित बैठकीनंतर लागू ? सीबीआयसी ने केले ट्विट

GST 4 YOU

वित्त कायदा, 2024 मधील जीएसटी संबंधित तरतुदी, 9 सप्टेंबर 2024 रोजी च्या  जीएसटी परिषदेच्या नियोजित बैठकीनंतर लागू होण्याची शक्यता आहे . असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) कर दात्याने केलेल्या एका ट्विटला प्रतिसाद म्हणून सांगितले. या करदात्याने जीएसटी कायद्यातील कलम 16 (4) आदी  सुधारणा लवकर होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.  व त्या सुधारणा च्या अभावी जीएसटी विभाग मागणी आदेश जारी करत असल्याचे म्हटले होते. यावर सीबीआयसी ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्याला उत्तर दिले की “जीएसटी संदर्भात वित्त कायद्याच्या तरतुदी लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकार जीएसटी कौन्सिलच्या शिफारशींनुसार जारी करत असते.  राज्यांना त्यांच्या जीएसटी कायद्यात त्याच धर्तीवर सुधारणा करणे आवश्यक आहे त्यांच्याशी समन्वय साधून हे करणे आवश्यक आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी जीएसटी कौन्सिलची  बैठक होण्याची शक्यता आहे आहे, जिथे हा मुद्दा परिषदेसमोर त्याच्या शिफारशींसाठी ठेवला जाईल.