वर्ष 2019-20 साठी जीएसटी कायद्याच्या कलम 73 अंतर्गत मागणी आदेश जारी करण्याची आज 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख

GST 4 YOU

आज, 31 ऑगस्ट 2024, आर्थिक वर्ष  2019-20 साठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्याच्या कलम 73 अंतर्गत मागणी आदेश जारी करण्याची अंतिम तारीख आहे. 
       जीएसटी कायद्याच्या कलम 73 अंतर्गत, फसवणूक, जाणूनबुजून चुकीचे विधान किंवा तथ्य दडवण्याची प्रकरणे सोडून इतर कोणत्याही कमी कर भरणा  किंवा कर न भरल्याबद्दल अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीस संदर्भात कर दायित्व निर्धारित करणारा आदेश पारित करण्याची मुदत आज संपुष्टात येत आहे.
मात्र जीएसटी कायदा, 2017 कलम 16 (4) च्या उल्लंघना बद्दल  दिलेल्या नोटिसा यांचे  काय हा प्रश्न करदाते व विभागासमोर होता. कारण केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या नुसार सदर तरतुदींमध्ये सुधारणा केली व  2017-18 ते 2020-21 या आर्थिक वर्षासाठी सवलत देण्यात आली. मात्र त्यानुसार केंद्रीय जीएसटी कायद्यात बदल झाला असला तरी संबंधित अधिसूचना जारी न झाल्याने काही ठिकाणी जीएसटी विभागाने या संबंधातील कारणे दाखवा सूचना या मागणी आदेशात परिवर्तित केल्या. त्यामुळे कर दात्यांमध्ये काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.