14.79 कोटीचा व्हॅट घोटाळा-कर चुकविणाऱ्या व्यापा-यांविरुध्द सांगली राज्य जीएसटी विभागाची धडक कारवाई

GST 4 YOU

कुपवाड, सांगली -तब्बल १४ कोटी ७९ लाख मुल्यवर्धित कर थकवल्या प्रकरणी नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिल च्या संचालकांवर सांगलीतील  कुपवाड पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबतची फिर्याद जीएसटी चे राज्यकर निरीक्षक वैभव  माने व राज्यकर निरीक्षक  शिवराज भोईटे यांनी दिली
       मे.नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिल, एम.आय.डी.सी. कुपवाड, सांगली या व्यापाऱ्याची सन २०१३-१४, २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीची एकुण थकबाकी १४ कोटी ७९ लाख  होती. सदर व्यापाऱ्यास वारंवार नोटीस बजावुन व पाठपुरावा करूनसुध्दा थकबाकीचा भरणा सरकारी तिजोरीत न केल्यामुळे सदर व्यापाऱ्यावरती एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन कुपवाड या ठिकाणी वसुली साठी रितसर एफआयआर करण्यात आला आहे.
कोल्हापुर विभागाच्या राज्यकर सहआयुक्त सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शना खाली राज्यकर उपायुक्त  सुनिल कानगुडे, राज्यकर निरीक्षक  वैभव  माने व राज्यकर निरीक्षक  शिवराज भोईटे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.
      "महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायदा-२००२ अंतर्गत थकबाकीदार असणाऱ्या व्यापाऱ्यांकडे थकबाकी भरण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र जे व्यापारी थकबाकीदार राहिले असतील त्यांच्यावरती कायदयानुसार कडक कारवाई करण्याची मोहिम सुरु केली आहे अशी माहिती राज्यकर उपायुक्त  सुनिल कानगुडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागा अंतर्गत प्रलंबित थकबाकी वसूली साठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे .याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातील मोठ्या थकबाकी दारा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरी कोल्हापूर विभाग विभागातील सर्व थकबाकीदार व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांचे कडील थकबाकीचा भरणा ताबडतोब करावा अन्यथा त्यांचे विरुद्ध दमनकारी कारवाई केली जाईल असे श्रीमती सुनिता थोरात, राज्यकर सह आयुक्त, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी सांगितले.