पुर्ण देशात जीएसटी नोंदणीसाठी बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरण आवश्यक- बोगस जीएसटी नोंदणीला बसणार चाप - ५३व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या शिफारशींची अंमलबजावणी

GST 4 YOU

बोगस जीएसटी नोंदणीला चाप  घालण्याच्या दृष्टिकोनातून 53 व्या बैठकीत जीएसटी परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार डेटा ॲनालिटिक्स आणि जोखीम पॅरामीटर्सच्या आधारे ओळखल्या गेलेल्या प्रकरणांमध्ये नोंदणी मंजूर करण्यापूर्वी आधार क्रमांकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि अर्जदाराच्या वैयक्तिक पडताळणीसाठी  पुर्ण देशात  आता जीएसटी नियम, 2017 च्या नियम 8 च्या उप-नियम (4A) च्या तरतुदी लागू करण्यासाठी सरकार ने जारी केले ली अधिसूचना क्रमांक 04/2023 दि. 31.03.2023 सर्व राज्ये/केंद्र शासित प्रदेशास लागू करण्यात आल्या आहेत. 
बायोमेट्रिक आधारित आधार प्रमाणीकरणाची निवड न करणाऱ्या अर्जदारांसाठी फोटो कॅप्चरिंग आणि मूळ दस्तऐवज पडताळणीसाठी जीएसटी सुविधा केंद्राला अनिवार्य भेट देण्याची तरतूद जीएसटी नियम, 2017 च्या नियम 8 च्या उप-नियम (4A) मध्ये दुसरी तरतूद समाविष्ट करून संबंधीत अधिसूचना क्र. 12/ 2024 तसेच 13/2024 दि. 10. 07.2024 लागू करण्यात आल्या आहेत. 
      फॉर्म GST REG-01 मध्ये जीएसटी नोंदणी अर्जासोबत अपलोड केलेले मूळ दस्तऐवज सत्यापित करणे आवश्यक आहे व अशी पडताळणी जीएसटी आयुक्तांनी अधिसूचित केलेल्या सुविधा केंद्रात करणे आवश्यक आहे.
     या तरतुदी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 10.07.2024 पासून लागू होतील.