₹१३२ कोटी च्या बनावट पावत्या प्रकरणी कर सल्लागाराला केंद्रीय जीएसटी कडून अटक

GST 4 YOU

जीएसटी कायदा, २०१७ च्या  कलम ६९ अन्वये बनावट आयटीसी साठी पावत्या जारी केल्याबद्दल कर सल्लागाराला बेळगावी केंद्रीय जीएसटी विभागाने अटक केली. कर सल्लागाराने त्याच्या  ग्राहकांकडून कर  भरणा साठी घेतलेले पैसे स्वतःच्या खिशात टाकून बनावट पावत्या जारी करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल ही  कारवाई करण्यात आली.

कर फसवणुकीचा पर्दाफाश करताना केलेल्या मोठ्या कारवाईत, केंद्रीय जीएसटी  अधिकाऱ्यांच्या पथकाने बनावट जीएसटी  इनव्हॉइस रॅकेट उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर बुधवारी नकीब नजीब मुल्ला या कर सल्लागाराला अटक केली. 
        बेळगावी केंद्रीय जीएसटी चे प्रधान आयुक्त दिनेश पांगारकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले की या कर सल्लागाराने कथितरित्या मे. फेडरल लॉजिस्टिक अँड कंपनी नावाची बनावट मालकी फर्म चालवून  ₹१३२ कोटी किमतीच्या बनावट पावत्या जारी केल्या, ज्यामध्ये ₹२३.८२ कोटी रुपयांच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) समावेश आहे. वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट पावत्या जारी करून फसव्या आयटीसीचा लाभ घेतल्याचा आणि पुढे  पास केल्याचा आरोप मुल्ला यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 
   त्याने कथितरित्या मे. फेडरल लॉजिस्टिक्स अँड कंपनी नावाची एक बनावट मालकीची फर्म तयार केली असून ती फर्म अनेक कंपन्यांसाठी रिटर्न भरणे आणि जीएसटी-संबंधित समस्यांचे व्यवस्थापन  आदी कामे करत असे. त्यातून त्याने  जीएसटी रिटर्न प्रक्रियेत फेरफार  केला. मुल्लाच्या या पद्धतीमध्ये ग्राहकांकडून मासिक जीएसटी दायित्वे पूर्ण करण्यासाठी रोख पेमेंट गोळा करणे समाविष्ट होते, ज्याचा वापर त्याने वैयक्तिक फायद्यासाठी करून घोटाळा केला. त्याने त्याच्या स्वत:च्या फर्मद्वारे,  त्याच्या नियंत्रणाखालील इतर फर्मद्वारे बनावट ITC वापरून जीएसटी दायित्वे भागवली . चौकशीदरम्यान आणि संबंधित रेकॉर्ड पुढे आल्यावर, मुल्लाने मासिक जीएसटी रिटर्न बनावट पध्दतीने तसेच त्यात फरक करून रोख रक्कम काढून घेतल्याचे कबूल केले. 
आरोपीला बेळगावी येथील जेएमएफसी II न्यायालयात हजर करण्यात आले, जेथे मा. दंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.