मद्य निर्मिती साठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA)/रेक्टिफाइड स्पिरिट (RS) जीएसटी कक्षेतून बाहेर-जीएसटी परिषदेचा निर्णय -साखर/आसवनी उद्योगाला फार मोठा दिलासा

GST 4 YOU

जीएसटी परिषदेने  52 व्या बैठकीत एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA)/ रेक्टिफाइड स्पिरिट (RS )वर वस्तू आणि सेवा कर आकारणी बद्दल  जीएसटी कायद्यात स्पष्टपणे सुधारणा करण्याची शिफारस केली होती.

जीएसटी कौन्सिलने आता  शनिवारी झालेल्या 53 व्या बैठकीतील निर्णयानुसार मानवी वापरासाठी अल्कोहोलयुक्त मद्य उत्पादनासाठी पुरवठा होणाऱ्या रेक्टिफाइड स्पिरिट (RS) / एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA) जीएसटीच्या कक्षेतून वगळणे साठी जीएसटी कायदा, 2017 च्या कलम 9  (1) उप कलमात सुधारणा करण्याची शिफारस केली आहे.
यामुळे साखर तसेच आसवनी उद्योगाला फार मोठा दिलासा मिळाला असून जीएसटी विभागाने जारी केलेल्या शेकडो कोटींच्या कारणे दाखवा नोटीसा या मागे घ्याव्या लागतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.