कोरेगेटेड आणि नॉन-कोरेगेटेड कागद यांचे कार्टन्स, बॉक्स आणि केसेस यावरील जीएसटी मध्ये कपात - फळे , फुले , भाजीपाला यांचे उत्पादक ,शेतकरी यांना यांना लाभ

GST 4 YOU
जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या ५३ व्या बैठकीत कोरेगेटेड आणि नॉन-कोरेगेटेड कागद यांचे कार्टन्स, बॉक्स आणि केसेस यावरील जीएसटी मध्ये कपात करण्यात येत असल्याचा निर्णय झाला असून १८ % दरावरून तो आता १२% करण्यात येत आहे. यामुळे द्राक्ष , बेदाणे , डाळिंब, आंबे आदी फळे , फुले , भाजीपाला  यांचे  उत्पादक , शेतकरी यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. या क्षेत्राची  अतिशय मोठी मागणी जीएसटी परिषदेने मान्य केल्याचे दिसून येत आहे. याच बरोबर औद्योगिक वापरासाठी  जाणारे बॉक्स यांनाही या दर कपातीचा लाभ होणार आहे.