जीएसटी परिषदेची ५३ वी बैठक २२ जून रोजी

GST 4 YOU

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्या नंतर आता 22 जून रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे अर्थ मंत्री यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 53 वी बैठक होत आहे. मात्र प्रस्तावित बैठकीचा अजेंडा अजुन पुढे आलेला नाही.

यापूर्वी 7 ऑक्टोबर 2023 रोजी या परिषदेची 52 वी बैठक झाली. या बैठकीत सर्व घटक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सहभागी झाले होते.
जीएसटी मुळे सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल आणि मे महिन्यात जीएसटी संकलनात मोठी वृद्धी पहायला मिळाली होती. जीएसटी संकलन प्रथमच 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं होतं. 
2024-25 साठी संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पही लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने 22 जूनची जीएसटी परिषद महत्त्वाची ठरू शकते.