जीएसटीच्या विक्रमी संकलनामुळे गुरूवारी शेअर बाजारात तेजी तर शुक्रवारी माञ चढ उतार

GST 4 YOU


जीएसटीच्या एप्रिल २०२४ महिन्यातील रू. २.१ लाख कोटी पेक्षा ज्यास्तीच्या संकलनाने नवा विक्रम स्थापन केल्यानंतर या आकडेवारीचा सकारात्मक प्रभाव भांडवली गुंतवणूकदारांवर झाला. त्यामुळे दोन्ही निर्देशांक वधारले. २ मे ला गुरुवारी एप्रिल २४ महिन्याची जीएसटी संकलन आकडेवारी जाहीर झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १२८.३३ अंकांनी वधारून ७४,६११.११ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ४३.३५ अंकांनी वर जाऊन २२.६४८.२० वर स्थिरावला होता.

मात्र शेअर बाजारात सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी जोरदार चढउतार पाहायला मिळाले. एका टप्प्यावर निफ्टीने २२,७९४ अंकांचा टप्पा गाठला परंतु नंतर १७२ तो अंकांनी घसरून २२,४७५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स दिवसभरातील एका टप्प्यावर ७५,०९५ अंकांच्या सर्वोच्च स्थानी पोहचल्यानंतर त्यात १,२१७ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स ७३,८७८ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २४ शेअर्समध्ये घसरण तर ६ मध्ये वाढ दिसून आली..