बिग फोरच्या श्रेणीत सामील होऊ शकतील, अशा भारतीय ऑडिटिंग फर्म स्थापन करा - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

GST 4 YOU


केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी इनस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या सदस्यांना बिग फोरच्या श्रेणीत सामील होऊ शकतील, अशा भारतीय ऑडिटिंग फर्म स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

पाटणा येथे आयसीएआय, बिहार चॅप्टर च्या सदस्यांशी बोलताना, श्रीमती सीतारामन यांनी 2047 पर्यंत विकसित भारतासाठी त्यांच्या 100 दिवसांच्या कार्यसूचीचा एक भाग म्हणून या उद्दिष्टासाठी वचनबद्ध होण्याचे आवाहन करून त्या म्हणाल्या की तुम्ही अशी सीए फर्म स्थापन केली पाहिजे, जी शीर्ष चार कंपनी श्रेणीची म्हणून ओळखली जाईल व ज्याकडे जागतिक ग्राहक आकर्षित होतील.
आम्हाला ते करण्यापासून काय रोखते?" भारतीय सीए उच्च दर्जाचे असूनही, ते भारतात बिग फोर फर्म बनवण्याऐवजी मुख्यतः बिग फोर फर्ममध्ये लीडर आणि भागीदार का बनतात? असा सवाल करून सीतारामन यांनी चार्टर्ड अकाउंटंट यांना प्रोत्साहन दिले.
इवाय ,पीडब्ल्यूसी, डेलोईट व केपीएमजी या ऑडिटिंग कंपन्याना जगात बिग फोर या नावाने संबोधले जाते.