राज्य जीएसटीच्या पथकाने मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) मधील अनेक कुलर व्यावसायिका वर छापे टाकून ,करचोरी पकडली. डेटा विश्लेषण आणि जीएसटी विभागाने मिळालेल्या इनपुट्सच्या आधारे रेकी केल्यानंतर, काही विक्रेत्यांकड़े एक सर्वेक्षण केले गेले. या फर्मशिवाय कारखान्याचेही सर्वेक्षण करण्यात आले. हिशेब पुस्तकाबाहेर मोठ्या प्रमाणात कुलरची विक्री होत असल्याचे तपासात आढळून आले.विक्रीचे चलन न देता व्यावसायिकाकडून मालाची विक्री केली जात होती. अंदाजे १.२५ कोटी रुपयांचा माल हिशोबाच्या पुस्तकांच्या तुलनेत कमी आढळून आला. व्यावसायिकाने जीएसटी कर आणि दंड म्हणून २५ लाख रुपये जमा केले आहेत.
व्यावसायिकाकडून विक्री बीजक जारी केले जात नसून, हमी/ वॉरंटी कार्डद्वारेच मालाची विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. तपासातही याची पुष्टी झाली. कारण 1 कोटी 21 लाख रुपयांचा माल हिशोबाच्या पुस्तकांच्या तुलनेत कमी आढळून आला. यावरून करचुकवेगिरी करून हिशेबाच्या वह्याबाहेर माल विकल्याचे स्पष्ट झाले.
जीएसटी सूत्रानी सांगितले की, व्यावसायिकाने आपली चूक मान्य केली आहे आणि डीआरसी 03 द्वारे जागीच कर आणि दंड म्हणून 25 लाख रुपये जमा केले आहेत.