फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस (FISME) आणि तामिळनाडू चेंबर ऑफ कॉमर्स या करदात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनानी, नवीन जीएसटी नोंदणी प्रक्रिये वेळी येत असणाऱ्या अनेक बाबींकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.या राज्यातील अनेक एमएसएमईंना जीएसटी नोंदणी मिळविण्यात अडथळे येत आहेत, असे या उद्योजक संस्थांनी एका निवेदनात म्हटले आहे.
सदर फेडरेशन आणि तामिळनाडू चेंबर ऑफ कॉमर्स यांनी वस्तू आणि सेवा कर (गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स) मध्ये ऑनलाइन नोंदणी मिळविण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि व्यापाऱ्यांसमोर अनेक अडचणी असल्याने सांगितले.अनेकदा तरतुदींचा चुकीचा अर्थ लावल्याने संबधित प्राधिकार्याची भूमिका ही करदात्यांसाठी अनेक अडचणी उभी करणारी झाली आहे. यामध्ये सामायिक व्यवसायाच्या जागांबाबत अत्याधिक छाननी तसेच ऑनलाइन करदात्यांनी प्रत्यक्ष उपस्थितीच्या आवश्यकतेनुसार परवाना नाकारण्याबद्दल चिंता व्यक्त केली. जीएसटी ची मार्गदर्शक तत्त्वे आणि प्राधिकार्याद्वारे त्यांची व्यावहारिक अंमलबजावणी यामध्ये अंतर पडले आहे, ज्यामुळे करदात्यांसाठी आव्हाने निर्माण झाली आहेत.
जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असूनही, वारंवार नकारांचा सामना करावा लागला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.https://indianexpress.com/article/business/economy/fisme-tamil-nadu-chamber-of-commerce-flag-concerns-about-gst-registration-9333975/#amp_tf=From%20%251%24s&aoh=17160488718336&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&share=https%3A%2F%2Findianexpress.com%2Farticle%2Fbusiness%2Feconomy%2Ffisme-tamil-nadu-chamber-of-commerce-flag-concerns-about-gst-registration-9333975%2F