बांधकामांच्या गुणवत्तेबाबत महारेरा' चे निर्देश - सर्व महत्वाची कामे प्रशिक्षित व गुणवत्ता धारक नोंदणीकृत अभियंते यांच्या कडून करावी लागणार प्रमाणीत

GST 4 YOU

बांधकाम प्रकल्पाची गुणवत्ता 'महारेरा' मानका नुसार आहे, असे हमीपत्र आता व्यावसायिकांना द्यावे लागणार असून. प्रकल्पाच्या गुणवत्तेची खात्री व उच्च दर्जाची घरे  साठी 'महारेरा' प्रयत्न शील असून  याबाबत जारी परिपत्रकात  व्यावसायिकांना गुणवत्ता मानक संबधित तपशिलानुसार हमीपत्र बांधकाम व्यावसायिकांना दरवर्षी महारेरा'कडे द्यावे लागणार आहे. 
    कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाची गुणवत्ता त्याची आर सी सी स्ट्रक्चरल डिझाईन, स्थिरता आणि विविध चाचण्या, त्या प्रकल्पात वापरलेली विविध प्रकारची साधन सामग्री, प्रकल्प उभारणीत सहभागी कामगारांची, मनुष्यबळाची कुशलता, गुणवत्ता अशा  बाबींवर ठरत असते. याबाबत व्यावसायिकाने प्रत्येक टप्प्यावर काटेकोरपणे काळजी घ्यावी , जेणे करून प्रकल्पाची गुणवत्ता चांगली राहील . यापुढे तशी हमी विकासकाने 'महारेरा'मार्फत आपल्या ग्राहकांना दरवर्षी द्यावी लागणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या या परिपत्रकात व्यावसायिकाने प्रकल्पाबाबत दरवर्षी द्यावयाच्या 'प्रकल्पाच्या गुणवत्ता हमी स्वयंप्रमाणित घोषणापत्राचा' मसुदा 'महारेरा'ने सूचना, मतांसाठी संकेतस्थळावर जाहीर केलेला आहे. याबाबत २३ मेपर्यंत suggestions.maharera@gmail.com या ईमेलवर सूचना, मते पाठवावीत, असे आवाहन 'महारेरा'ने केले आहे.
 ठळक मुद्दे 
■ प्रकल्पाच्या उभारणीत वापरले जाणारे साधन सामग्री जसे सिमेंट, काँक्रीट, स्टील, इलेक्ट्रिकल वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटिंग्ज ही सामग्री बीएस/आयएस/एनबीस प्रमाणित आहेत ना, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची चाचणी करून बांधकामयोग्य पाणी वापरले गेले ना या सर्व चाचण्यांच्या नोंदवह्या प्रकल्पस्थळी असायला हव्यात.
■ कारागिरीमध्ये कौशल्य तसेच प्रकल्पातील विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण अशी सर्व महत्त्वपूर्ण कामे नोंदणीकृत अभियंते, कंत्राटदार यांच्या पर्यवेक्षणाखाली झाली ना आदीचा तपशील अपेक्षित आहे. या सर्व बाबी प्रकल्प पर्यवेक्षक, अभियंते यांनी प्रमाणित करून दिल्यानंतर प्रवर्तकाला सर्व बाबींची पुन्हा खात्री करून 'गुणवत्ता हमीचे घोषणापत्र' स्वतः प्रमाणित करूनच सादर करावे लागणार आहे. ज्यामुळे विकासकाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.