आयकर खात्याकडून नांदेडमध्ये पाच ते सात ठिकाणी छापे- आय कर विभागाच्या पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर , परभणी येथील पथकांचा सहभाग

GST 4 YOU

आयकर खात्याने काल नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये   पाच ते सात ठिकाणी  छापे टाकले. एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर  हे छापे टाकले गेले. नांदेडमध्ये काल सकाळी भंडारी फायनान्स यांच्याकडे आयकर विभागाची चौकशी सुरू केली. अली बाई टॉवर इथल्या दुकानात ६० हून अधिकारी यांनी  झडतीत  सहभाग घेतला
 पुणे,  छत्रपती संभाजीनगर, नागपूर , परभणी, मुंबई आणि नाशिक येथील आयकर विभागाची पथके यात सहभागी आहेत. ही छापेमारी नेमकी कशासाठी केली जात आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
    भंडारी या फायनान्स व्यापाऱ्यासह त्यांच्या भावाच्या कार्यालय आणि निवासस्थानी पथकाने जवळपास दिवसभर झाडाझडती केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोख, सोने-चांदी आणि कागदपत्रे सापडली असून त्याची तपासणी आणि चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कार्यालयावर शुक्रवारी सकाळी जवळपास २५ गाड्यांच्या ताफ्यासह आलेल्या ६० हून अधिक अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्याचबरोबर भंडारी फायनान्सच्या कोठारी कॉम्प्लेक्स येथील कार्यालयावर,  पतसंस्था आणि  त्यांच्या निवासस्थानी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.या कारवाईमुळे दिवसभर नांदेड शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. मात्र विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.