आयकर संबंधित "ही" कामे 31 मे 2024 पर्यन्त करा! अन्यथा होऊ शकतो दंड!!

GST 4 YOU

काही विशिष्ठ वर्गवारीतील व्यक्तींसाठी विशिष्ट आर्थिक व्यवहारांचे प्रपत्र (स्टेटमेंट ऑफ स्पेसिफाईड फायनान्शिअल ट्रांजेक्शनस्- एसएफटी) सादर करण्यासाठीची अंतिम मुदत 31 मे 2024 आहे.
    पुढील वर्गवारीतील व्यक्ती जसे वस्तू किंवा सेवा पुरवठादार (ज्यांचे खाते आयकर कायदा, 1961 च्या कलम 44 एबी अंतर्गत लेखा परीक्षण करणे आवश्यक आहे) , दुय्यम निबंधक, सहकारी बँका , पोस्टमास्तर जनरल, बॉण्ड्स किंवा भाग जारी करणारे, बँकिंग कंपनी, निधी, म्युच्युअल फंडचे ट्रस्टी किंवा  म्युच्युअल फंडांचे कार्यकारी व्यक्ती, परकीय चलन विनिमय डीलर्स, लाभांश  देत असलेल्या कंपनी,  कंपनी ज्या पुन्हा त्यांचे भाग परत घेत आहेत, असे असतील  तर त्यांनी आयकर नियम, 1962 च्या नियम 114ई नुसार आर्थिक वर्ष  2023- 24 साठी थर्ड पार्टीसह नमूद व्यवहारांसाठी फॉर्म नंबर 61ए मध्ये नमूद आर्थिक व्यवहारांचे विवरण (एसएफटी) फाईल करणे आवश्यक आहे .
एसएफटी सादर करताना झालेल्या विलंबासाठी सदर व्यक्ती डिफॉल्टच्या प्रत्येक दिवसासाठी रू.1000 पर्यंतच्या दंडासाठी पात्र राहील.
प्रपत्रे न भरणे किंवा चुकीची विवरणपत्रे सादर केल्यास सुद्धा दंड आकारला येईल.
अधिक माहितीसाठी  राज्य/ विभागातील  डीआयटी (आय & सी)  येथे संपर्क साधावा किंवा विभागाची वेबसाईट  incometaxindia.gov.in/documents/departmental-directory.pdf येथे संपर्क साधावा असे  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ / आय कर विभाग यानी स्पष्ट केले आहे.