केंद्रीय जीएसटी गुप्तचर महा संचालनालय (डीजीजीआय) कोलकाता झोनल युनिटच्या अधिकाऱ्यांनी 232.88 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी राणीगंजमधील 3 व्यावसायिकांना अटक केली आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे या व्यावसायिकांच्या 12 कंपन्यांच्या समूहाच्या कार्यालयांवर छापे टाकले. त्यांच्या गोदामांवर छापे टाकण्यात आले. मात्र, त्या कंपनीचा पुरवठा दाखवून विद्यमान कंपनीशी केलेला व्यवहार बनावट असल्याचे तपासात उघड झाले. त्याचे अस्तित्वच नव्हते. या कंपन्यांमध्ये निर्माण झालेल्या ई-वे बिलांच्या विश्लेषणातून या 12 कंपन्यांनी बनावट आयटीसीचा लाभ घेतल्याचे आणि त्याचा वापर केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला या तिन्ही व्यावसायिकांना अनेकदा बोलावूनही ते येत नव्हते. नंतर ते आल्यावर त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवण्यात आली. यानंतर त्यानी 12 संस्था नियंत्रित करून चालवल्याची कबुली दिली आणि बनावट बिले दिल्याचे तसेच बनावट बिले मिळाल्याचेही कबूल केले. सर्व 12 संस्थांमध्ये ते स्वतः संचालक आणि भागीदार होऊ शकत नसल्यामुळे, उर्वरित प्रकरणांसाठी त्यांनी इतर काही व्यक्तींना संचालक किंवा भागीदार म्हणून नियुक्त केले परंतु अशा इतर व्यक्तींची कोणतीही भूमिका नव्हती हेही त्यांनी मान्य केले.
या बनावट व्यवहारातून मिळणारा नफाही त्यांनी स्वत:कडे ठेवला आणि बाजारातून वाहनांचे क्रमांक मिळवले आणि हे क्रमांक चलन आणि ई-वे बिला मध्ये वापरले.