प्रसिध्द पान व्यापाऱ्याच्या २८ आस्थापनांवर राज्य जीएसटीने इंदूरमध्ये मोठी कारवाई केली. कोट्यवधी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणी राज्य जीएसटीने सुपारी व्यापारी कर्नावत ग्रुपच्या २८ आस्थापनांवर कारवाई केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जीएसटी अधिकार्यानी मोठा फौजफाट्यासह मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या आस्थापनांवर छापे टाकले.
या काळात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जीएसटीच्या छाप्यानंतर कर्नावत ग्रुपची सर्व दुकाने बंद झाली.
या ग्रुपचा सर्वात मोठा व्यवसाय किरकोळ पान आणि सुपारीचा आहे.ग्रुप प्रमुख हा फक्त त्याच्या नातेवाईकांना त्यांच्या फ्रंचाईजी देतो आणि त्यांना सर्व साहित्य स्वतः पुरवतो.
सतत च्या करचुकवेगिरीमुळे या कर्नावत समुहा वर जीएसटी कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.