दिल्ली राज्य जीएसटी विभागाकडून नवीन जीएसटी नोंदणी संदर्भातील स्पष्टीकरणा साठी केंद्रीकृत नोंदणी कक्षास भेटीची मुभा

GST 4 YOU
       
दिल्ली राज्य जीएसटी विभागाने  सीए, वकिल, अर्जदार, सामान्य नागरिक आदीना त्यांच्या  जीएसटी नवीन नोंदणी अर्जाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्रीकृत नोंदणी कक्षास (सीआरसी) ला भेट देण्याची परवानगी देण्यासाठी एक सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.
     दि.०४.०४.२०२४ च्या सार्वजनिक सूचने नुसार सदर सीआरसी शाखेत  सामान्य नागरिक/अर्जदार/ वकील/सीए यांना दर सोमवार आणि गुरुवारी दुपारी 3:00 ते 4:00 या कालावधीत त्यांच्या जीएसटी नवीन नोंदणी अर्जा बाबत स्पष्टीकरण देता येईल.
हे महत्वाचे आहे की दिल्ली सेल्स टॅक्स बार असोसिएशनच्या सदस्यांनी जीएसटी संबंधीत  केलेल्या विविध विनंत्या आणि सूचनांमध्ये केंद्रीकृत नोंदणी कक्षामध्ये अधिकृत प्रतिनिधिस प्रवेश देण्यासंबंधी मागणीचा ही समावेश होता .